पुरग्रस्तांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात - गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

0 झुंजार झेप न्युज

पुरग्रस्तांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात - गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

सातारा,दि. 22 : पाटण परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पाटण शहर व विविध ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण होते. संबंधित यंत्रणांनी पुरग्रस्तांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सुचना गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टी व पुरपरिस्थितीच्या अनुषंगाने गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा बैठकीत दिल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील व संबंधित यंत्रणांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी संभाव्य पुरस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सांगितले.

यावेळी अतिवृष्टीमुळे कोयना नदीला पुर आल्याने पाण्याखाली गेलेल्या मुळगाव पुलाची पाहणी व पाटण एस.टी. स्टँड परिसरातील पुरपरिस्थितीची पाहणी गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.