पूरबाधित गावांना टँकरने शुध्द पाणी पुरवा, स्वच्छतेची मोहिम तातडीने राबवा- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

0 झुंजार झेप न्युज

 आरोग्य तपासणी शिबिरे, प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप सुरु करानु कासनीचे पंचनामे करताना प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाला वस्तुनिष्ठ पंचनामे करा.


सांगली,दि.27 : नदी काठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती असून या गावांना शुध्द पाण्याचा पाणी पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तालुका प्रशासनाने पूरबाधित गावांना तातडीने टँकरने शुध्द पाण्याचा पुरवठा सुरु करावा, जसजसे गावातील पाणी उतरेल तसतसे स्वच्छतेची मोहिम तातडीने राबवावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. 

जिल्हाधिकाऱ्यांची वारणा काठच्या कणेगाव, बोरगाव, जुने खेड, वाळवा व आष्टा येथे भेटी देऊन पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी तहसिलदार राजेंद्र सबनिस, गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे, संबधित गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्या व पदाधिकारी उपस्थितीत होते. 

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पूर परिस्थिती कमी होत असून त्यामुळे अन्य आजार उदभवण्याची शक्यता आहे. त्यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रोगराई पसरु नये यासाठी गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. तसेच प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप संबधित ग्रामपंचायतींनी सुरु करावे. गावांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याबाबत योग्य दक्षता घेण्यात यावी. यामध्ये मेडिक्लोर टाकुन शुध्द करण्यात यावे. शेतीचे झालेले नुकासान, घरांची झालेली पडझड, लोकांच्या घरात गेलेले पाणी त्यामुळे जिवनावश्यक वस्तुंचे झालेले नुकसान याची पाहणी करताना शासनाच्या निकषानूसार पंचनामे करताना नुकसान झालेल्या भागाच्या ठिकाणी प्रत्येक्ष भेटी देऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व त्याचा अहवाल तातडीने जिल्हा प्रशासनास करावा अशा सूचना तालूका प्रशासनाला दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.