बेलसर मध्ये वाळू माफियांवर कारवाई

0 झुंजार झेप न्युज

बेलसर मध्ये वाळू माफियांवर कारवाई

पुरंदर (पुरंदर प्रतिनिधी) : पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील पुलाच्या जवळील कऱ्हा नदीच्या पात्रातील वाळू उपसा करण्यासाठी (बुधवार,दि. 22)रात्री साडेदहा वाजता जे.सी.बी सहाय्याने वाळू काढण्याचे काम चालू असताना सतर्क ग्रामस्थांनी जेजुरी पोलीस स्टेशनला कळविले.पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली लगेच पोलीस कर्मचारी संदीप मोकाशी व भानुदास सरक यांनी घटनास्थळी धाव घेऊन जे.सी.बी. क्रमांक जी जे 34 एस 0837 हो मोठा क्रमांक एम एच 12 एक.क्यू.3031 तसेच 20 हजार रुपयांची वाळू जप्त करण्यात आली. याप्रकरणी सोमनाथ रामराव जगताप रा.मावडी कडेपठार व मंगेश किशन हरपले रा. जेजुरी यांना ताब्यात घेण्यात आली असून अधिक तपास पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, यांनी कारवाई केली अधिक तपास पोलीस हवालदार संदीप कारंडे,धर्मवीर खांडे करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.