युपीएससी.परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या माधुरीताई गरुड हिचा सत्कार

0 झुंजार झेप न्युज

युपीएससी.परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या माधुरीताई गरुड हिचा सत्कार

पुरंदर : पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील माजी स्वातंत्र्य सैनिक कै.मारुती आप्पा गरुड यांचेचिरंजीव सेवानिवृत सेल्स टेक्स अॉफिसर भानुदास मारुति गरुड यांची कन्या माधुरीताई भानुदास गरुड हिने केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत [युपीएससी] घेण्यात आलेल्या परिक्षेत ५६१ वी रँक प्राप्त करुन घवघवीत यश मिळावल्याच्या प्रतिर्थीत बेलसर ग्रामस्थ,बेलसर ग्रामपंचायत ,पाणी फॉऊँडेशन व स्वाराज्याची पहिली लढाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त पुढाकाराने सत्कार जिल्हा परिषद व स्थायी समिती सदस्य दत्ताशेठ झुरुंगे यांच्या हस्ते करण्यात आला.

दहावीला ९४ टक्के गुण मिळविल्या नंतर पुण्यातील फग्युरसन महाविद्याल्यात कला शाखेत प्रवेश घेतला.आपण हे यश केवळ कठोर परिश्रम जिद्द व ईच्छा शक्तीच्या जोरावर मिळावल्याचे सांगितले .कार्यक्रमला बेलसर ग्राम पंचायतीचे सरपंच अर्जुन तात्या गरुड उपसरपंच धिरजभाऊ जगताप ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य तंटामुक्तीचे अध्यक्ष ,पाणी फॉऊंडेशनचे सर्व टिमसदस्य व रणधिर जगताप मामासौ गरुड शिक्षक नेते संदीपआप्पा जगताप संदिप कदम व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व तरुण वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.