शहरपातळीवर शिवसेनेचे नेतृत्व करण्याची संधी उत्तर भारतीय निष्ठावंतांना द्या : विजय गुप्ता

0 झुंजार झेप न्युज

सेनेच्या विजय गुप्तांची पदाधिकारी आढावा बैठकीत वरिष्ठांकडे मागणी.

पिंपरी चिंचवड,दि.19: महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर आकुर्डीत शिवसनेच्या पिंपरी विधानसभेची बुधवारी (दि. १८) रोजी पदाधिकारी आढावा बैठक आयोजित केली होती. बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी शहरातील पक्ष बांधणीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर,पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, युवा सेना विस्तारक राजेश पळसकर, मा. आ. गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख वैभव थोरात, शहर प्रमुख सचिन भोसले, पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता, शहरातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते.

बैठकीत सेनेचे विजय गुप्ता यांनी पिंपरी चिंचवड शहरात उत्तर भारतीय नागरिकांचे प्रश्न उपस्थित केले. उत्तर भारतीय नागरिक अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्य करीत आहेत. केवळ निवडणुकांपुरतेच त्यांना लक्षात ठेवले जाते. उत्तर भारतीयांच्या हितासाठी शहरपातळीवर शिवसेनेचे नेतृत्व करण्याची संधी पक्षातील निष्ठावंतांना देण्याची गरज निर्माण झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन गुप्ता यांना दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.