खेड तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा हल्ल्याचे प्रमाण वाढले

0 झुंजार झेप न्युज

खेड तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा हल्ल्याचे प्रमाण वाढले

खेड (बबन खेसे खेड तालुका प्रतिनिधी) : तालुक्याच्या पूर्व भागातील रेटवडी व जवळके बु. या ठिकाणी महिलांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले असून काल रेटवडी येथील अरुणा संजय भालेकर व रिजवाना बाळासाहेब पठाण यांच्यावर हल्ला केला असून आज परत जऊळके बु.येथील लताबाई शिवाजी बोर्हाडे यांच्या वर सकाळी सहा वाजता बिबट्यानी पुन्हा हल्ला केला आहे. सर्व जखमी झालेल्या महिलांना खेड ग्रामीण रुग्णालय व पुणे येथील ससुन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागात सतत अशा घटना घडत असून याआधी सार्थक नवनाथ वाबळे रेटवडी यावर सुद्धा बिबट्याने हल्ला केला आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.वन विभाच्या वनरक्षक श्रीमती सुषमा चौधरी व बी.डी.सांडभोर यांच्या श्री संपर्क केला असता आम्ही बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करणार आहे त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावणार असल्याचे व ट्रॅक कॅमेरे आणि त्याच्या माग घेण्यासाठी पावलांचे ठसे घेतले असून आम्ही लवकरात लवकर त्याचा बंद करणार असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी सावध रहावे व घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.