राहेर ग्राम.पंचायतचे लाचखोर सचिव व सरपंच पती एसीबीच्या जाळ्यात

0 झुंजार झेप न्युज

रस्त्याचे देयक काढण्यासाठी पैशाची मागणी करणे भोवले

अकोला : पातुर तालुक्यातील राहेर अडगाव ग्राम पंचायतचे लाचखोर सचिव राजेंद्र श्रीराम मेहरे, व सरपंच पती अशोक सहदेव बोराडे,यांना लाचलुचपत विभागाने बुधवार दि, ८ जून रोजीच्या सकाळी अटक केली असून, गुन्हा दाखल केला आहे. राहेर अडगाव ग्राम पंचायत अंतर्गत परिसरातील एका कंत्राटदाराने २०१७ ते २००१८ वर्षी रोजगार हमी योजने अंतर्गत रस्त्याचे काम केले होते, सदर कामाचे जवळपास सात ते आठ लाखांचा देयक काढण्यासाठी लाचखोर सचिव राजेंद्र श्रीराम मेहरे व सरपंच राजश्री बोराडे यांचे पती अशोक सहदेव बोराडे, यांनी कंत्राटदाराला एक लाख २७ हजार ५०० रुपयांची मागणी केली होती, पैशाची मागणी पूर्ण न केल्याने सचिव व सरपंच पती देयक काढण्यास गेल्या काही महिन्यापासून दिरंगाई करून टाळाटाळ करीत होते, त्यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटदाराने थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली, आणि लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला, आणि पातुर बाळापुर मार्गावरील एका रसवंतीवर पैशे स्वीकारण्यासाठी सरपंच पती अशोक बोराडे यांनी कंत्राटदाराला २७ मे रोजी बोलाविले, पैशे स्वीकारण्या आधीच सरपंच पतीला संशय आल्याने पैशे स्वीकारण्यास नकार दिला होता, त्यामुळे ८ जून रोजी दोघांना अटक करण्यात आली असून ,गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास लाचलुचपत विभाग करीत आहे.

*याच साचिवावर निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप*

लाचखोर सचिव राजेंद्र मेहरे यांच्यावर शासनाच्या निधीचा दुरुपयोग करून अनियमितता केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परंतु त्यांना वरिष्ठांचे पाठबळ असल्याने त्यांच्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती हे विशेष

*एसीबीच्या या अधिकाऱ्यांनी केली कारवाई*

पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवडे, पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शुद्धोदन इंगळे, दिगंबर जाधव, प्रदीप गावंडे, सुनील येलोने, कृष्ण पळसपगार, नदीमोद्दीन शेख, नापोशी, शिल्पा वानखडे, इमरान अली, सलीम खान, यांनी कारवाई केली आहे.

*वरिष्ठांच्या पाठबळामुळे सचिवावरील वचक संपला*

तालुक्यातील अनेक सचिवावर शासनाच्या निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दोन सचिवावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली असून, अनेक सचिव कारवाईच्या रडारवर आहे, परंतु संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे सचिवावरील वचक संपल्याचे दिसून येत आहे.*देयक काढण्याचे १२ टक्के कमिशनवर ठरले*

रस्त्याचे देयक काढण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून कमिशनची अट सुरू होती, कमिशनची टक्केवारी कंत्राटदार व सचिव तसेच सरपंच पती यांच्यामध्ये सौधा होत नसल्याने देयक काढण्याचे काम रेंगाळले होते,अखेर १२ टक्के कमिशनवर देयक काढण्याचे ठरले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.