राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सुशिक्षित बेरोजगार नोंदणी अभियान.

0 झुंजार झेप न्युज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सुशिक्षित बेरोजगार नोंदणी अभियान. 

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज बुधवार दि १५ जून ला रावेत येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी त्यांनी अध्यक्षपदाची धुरा संभाळल्यानंतरची जी विधायक कामे केली त्या ५२ कामाची माहिती चित्रफिती द्वारे दिली. राष्ट्रवादीच्या वतीने रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे पिंपरी चिंचवड शहराचे युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगितले.

यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी देहूत झालेल्या शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बोलू दिले नाही याबद्दल तीव्र शब्दात निषेध वेक्त केला. हा सोहळा भाजपा ने हॅकजॅक केला होता अजित दादा पवार यांना बोलू न देणे हा संपर्ण महाराष्ट्राचा आपमान आहे असे यावेळी अजित गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख म्हणाले "केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक मोठे मोठे कारखाने

उद्योग-व्यापार बंद पडले असून लाखोंच्या प्रमाणात तरुण नोकरीच्या शोधात गटांगळ्या खात आहे. बेरोजगारी वाढल्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आणि रस्त्यावर यायची वेळ आली आहे या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड च्या वतीने दिनांक 18 जून ते 26 जून या कालावधीमध्ये संपूर्ण शहरात सुशिक्षित बेरोजगार नोंदणी अभियान राबवत आहोत. या अभियानांतर्गत संपूर्ण शहरात बेरोजगार तरुणांची नोंदणी करून त्यांची त्या त्या क्षेत्रातील विभागणी करून त्यांना रोजगार देणे कामी आम्ही सुशिक्षित बेरोजगार मेळावा घेत आहोत. बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गुणवत्तेच्या आधारे काम करणाऱ्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकनिष्ठ असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते यांना यांना ताकद दिली जाईल व त्यांचा सन्मान केला जाईल. तसेच पदभार घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जो कोणी पदाधिकारी टाळाटाळ करत असेल त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे त्यांच्या पदांना स्थगिती देण्यात येईल असेही इम्रान शेख म्हणाले.

ज्येष्ठ नेते योगेश बहल यावेळी म्हणाले, मेट्रोच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी खडे बोल सुनावले होते याची आठवण करून दिली. त्याच प्रकारे देहू गाव येथे देखील अजित दादा पवार हे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाने केलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपाची गोची करतील याचा अंदाज लागल्यामुळे कदाचित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बोलण्याची संधी दिली गेली नाही.

यावेळी या पत्रकार परिषदेला प्रवक्ते माजी महापौर योगेश बहल, मा विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, मयुर कलाटे, कार्याध्यक्ष राहुल भोसले,चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे,युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी, निलेश निकाळजे, आणि उपाध्यक्ष मझर खान, दिनेश पटेल, सतीश परब,राहुल पवार, तुषार ताम्हणे, दीपक गुप्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.