पूर्व भागातील गावांसाठी मोफत पाणी वाटप शुभारंभ करताना.-ॲड विजयसिंह शिंदे पाटील
खेड,दि.3 (बबनराव खेसे खेड प्रतिनिधी): तालुक्यातील पूर्व भागातील पाणी टंचाईग्रस्त गुळणी ,वाफगाव वाकळवाडी ,जऊळके खु ,जऊळके बु ,चीचबाईवाडी , गाडकवाडी ,वरुडे ,पूर ,कनेरसर गोसासी ,चौधरवाडी या भागासाठी समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत पाणी वाटप उपक्रमाचा वाफगाव येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.. एक सामाजिक भूमिकेतून समर्थ फाउंडेशन च्या माध्यमातून हा पाणी वाटप उपक्रम चालू केलेला आहे. पाणी म्हणजेच जीवन.. म्हणूनच अनेक गरजवंत लोकांना या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.. वाफगाव पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार... यावेळी कार्यक्रमास ज्येष्ठ नेते मारुती सातकर ,जिल्हा युवा सेना समन्वयक धनंजयबाप्पू पठारे,युवा सेना उपतालुका विशालआप्पा पोतले, सरपंच संतोषभाऊ गार्डी, वाफगाव सरपंच उमेशशेठ रामाणे, उपसरपंच नंदकुमार सुर्वे, युवा नेते अमोलशेठ इंगळे, शरद काका थिटे, भरत थिटे संजय कोळी,प्रकाश गार्डी, पांडुरंग रणपिसे ,संतोष रणपिसे, काळुराम लंगोटे ,युवा अमोल कराळे बाळासाहेब पिंगळे ,बाळासाहेब येवले ,उपसरपंच दिलीप भगत ,तुकाराम भोंडवे ,भाऊसाहेब भालेकर, नवनाथ तांबे ,मोहनराव तांबे ,माऊली शिंदे, विक्रम काळे ,महेश शिंदे ,नंदकुमार कातोरे, युवा बाबूशेठ कोळपे,शुभम पठारे , नेते नितीनअप्पा आवटे ,युवा रुपेशआप्पा घारे ,अजित घारे ,गणेश म्हसाडे ,बाळासाहेब दौंडकर रामभाऊ दौंडकर ,गणेश शिंदे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

