शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील इ. १० आणि १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांची बक्षीस रक्कम तातडीने द्या - चेतन बेंद्रे

0 झुंजार झेप न्युज

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील इ. १० आणि १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांची बक्षीस रक्कम तातडीने द्या - चेतन बेंद्रे 

पिंपरी चिंचवड : महानगरपालिकेच्या वतीने दर वर्षी इयत्ता १० आणि १२ मध्ये ८०% पेक्षा जास्ती गुण संपादन केलेल्या खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समाज विकास विभागा तर्फे इतर कल्याणकारी योजने अंतर्गत बक्षीस दिली जाते. या वर्षी चे दहावी आणि बारावीचे निकाल लागून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. परंतु, महापालिकेने अद्याप दोन्ही परीक्षेतील मागच्या वर्षी च्या म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे ५०% पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांचे रोख रक्कम चे पैशे अद्यापही दिलेले नाही अशी माहिती आम आदमी पार्टी चे कार्यकारी अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी दिली. 

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस रक्कम देण्याची वेळ आली असताना मागील बॅकलॉग अजून बाकी असल्यामुळे पालक अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र देऊन राहिलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी च्या वतीने करण्यात आली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.