राष्ट्रपतीपदी विराजमान द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा

0 झुंजार झेप न्युज

राष्ट्रपतींच्या शपथग्रहण समारंभास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

नवी दिल्ली,25: श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली, या समारंभास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली आणि भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून त्या पदावर विराजमान झाल्या. यासाठी त्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या.

'भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या श्रीमती मुर्मू या पदाची शान आणखी वृद्धिंगत करतील. त्यांच्यामुळे भारताचा गौरव जागतिक स्तरावर आणखी उ़ंचावेल, असा सार्थ विश्वास आहे. त्यांच्या कारकिर्दीला आदरपूर्वक शुभेच्छा,' असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.दरम्यान, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथ ग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी राष्ट्रपती महोदयांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या समारंभास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री व राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभास उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.