जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते जलपूजन

0 झुंजार झेप न्युज

9 हजार 432 क्यूसेकने विसर्ग सुरु

धरणाचा पाणी साठा 90 टक्क्याच्यावर

नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन

औरंगाबाद : पैठण जायकवाडी धरणाचा (नाथ सागर जलाशय) पाणीसाठा 90 टक्क्याच्यावर पोहचत असल्याने आज सायंकाळी साडे सहा वाजता धरणाची 18 दरवाजे अर्धा फुटाने उचलत नऊ हजार 432 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते जलाशयाचे विधिवत पूजन झाले, त्यानंतर त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात वक्र दरवाजाचे बटन दाबून गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू केला आहे. 

यावेळी तहसीलदार दत्तात्रेय निलावाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांची उपस्थिती होती. सध्या जायकवाडी धरणात 36 हजार क्यूसेक्स यावेगाने पाणी दाखल होत आहे.सध्या धरणाचा पाणी साठा 90 टक्क्यांहून अधिक झाला आहे. सोडण्यात आलेला विसर्ग मोठ्याप्रमाणात असल्याने नदी पात्र दुथडी भरुन वाहात आहे. नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी नागरिकांना केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.