S - Square कोचिंग क्लासेसच्या वतीने साईनाथ नगर निगडी येथे स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न.

0 झुंजार झेप न्युज

S - Square कोचिंग क्लासेसच्या वतीने साईनाथ नगर निगडी येथे स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न.

पिंपरी चिंचवड,दि.15 : ऑगस्ट 2022 रोजी S - Square कोचिंग क्लासेसच्या वतीने साईनाथ नगर निगडी येथे स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव कार्यक्रम क्लासेस चे संचालक सौ. शिल्पाताई सुरज गायकवाड व श्री.सुरज चंद्रकांत गायकवाड यांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी सनराईज इंटरनॅशनल स्कूल व ऑपलाइंज फाऊंडेशनचे एम. डी. सीईओ श्री. राजनजी नायर सर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या जेष्ठ महिला नेत्या सौ. आशाताई भोसले, सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांतजी गायकवाड, पी. एस.आय.पी.एल कंपनीचे श्री. विशालजी केंगार, व श्री. परमेश्वर निसर्गद्ध, सामाजिक कार्यकर्ते श्री. बुद्धभूषण आहिरे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी क्लासेस च्या मुलांच्या वतीने देशभक्तीपर गीते व लहान मुलांचे मनोगत, पालकांचे मनोगत तसेच नृत्य सादरीकरण करण्यात आले. वकृत्व स्पर्ध मध्ये संपत गावडे या पहिलीच्या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले व श्रेयस भालेराव याला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तसेच नृत्य स्पर्धा मध्ये ८ वीच्या विद्यार्थिनीचा प्रथम, तिसरी वर्गामधील तनिष्का धंदर दुसरा क्रमांक व नववीच्या विद्यार्थिनीचा तिसरा क्रमांक काढण्यात आला होता यावेळी क्लासेस चे शिक्षक पूजा आहीरे, योगेश मुरकुटे, वैष्णवी चौधरी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. शिल्पाताई सुरज गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन श्री.सुरज चंद्रकांत गायकवाड यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.