महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या महासचिव पदी संदिप गर्कळ व उपाध्यक्षपदी सतीश बेदरे यांची नियुक्ती
मुंबई: महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन या संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारावरील वितरण व्यवस्थेवरील फोटोग्राफर ,जाहिरात प्रतिनिधी वरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्या पत्रकार संघटनेच्या वतीने बीड जिल्हा महासचिव पदी संदिप गर्कळ व उपाध्यक्षपदी सतीश बेदरे यांची संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांनी बीड जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ शरणागत यांच्या शिफारशीनुसार नियुक्ती केली . व त्यांना पुढील भविष्यासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचा बीड जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपासून तर नेतेमंडळी व सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत चांगला संपर्क आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यातील पत्रकार व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.

