यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय! एकनाथदादाचं कार्यकर्त्यांना आवाहन

0 झुंजार झेप न्युज

यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय! एकनाथदादाचं कार्यकर्त्यांना आवाहन

पिंपरी चिंचवड,दि.24: भोसरी विधानसभेचे आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई किसनराव लांडगे याचं अल्पशा आजाराने निधन झाले. यामुळे भाजप प्रदेश प्रवक्ते एकनाथदादा पवार यांनी (25 ऑक्टोंबर) त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तसंच हितचिंतकांनी माझा वाढदिवस साजरा करु नये, वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून नुकसानग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करावी, असेही आवाहन एकनाथदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांचा मंगळवार (दि. 25 ऑक्टोंबर रोजी) वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी कोणत्याही सोहळे-समारंभांचे आयोजन करु नये, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, होर्डिंग्ज् लावू नयेत, वृत्तपत्रे, टिव्ही, समाजमाध्यमांवर जाहिराती प्रसारित करु नयेत, यावर होणारा खर्च वाचवून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना मदत करावी. लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन एकनाथदादा पवार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.