कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे मार्च २०२३ मध्ये उद्घाटन-नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

0 झुंजार झेप न्युज

कोल्हापूर-मुंबई दरम्यान विमानसेवेस नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते सुरुवात

                               

नवी दिल्ली,04 : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी उडान योजनेंतर्गत आज नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे कोल्हापूर-मुंबई दरम्यान विमानसेवेचे उद्घाटन केले.येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या राजीव गांधी भवनात आयोजित कार्यक्रमात नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते विभागाचे राज्यमंत्री जनरल(निवृत्त) व्ही.के. सिंह, अपर सचिव उषा पाधी यांच्या उपस्थितीत कोल्हापूर -मुंबई विमानसेवेचे दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. पुढील वर्षी मार्च महिन्यात कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे(डोमेस्टिक टर्मिनल) उद्घाटन करण्यात येईल ,असे आश्वासन श्री.सिंधिया यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमास कोल्हापूर विमानतळाहून खासदार सर्वश्री संजय मंडलिक, ध्यैर्यशिल माने,धनंजय महाडिक आदि तसेच पंढरपूर येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान योजनेंतर्गंत देशातील २ टियर आणि ३ टियर शहरांना विमानसेवेने जोडण्याच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर आणि मुंबई शहरांमध्ये ही विमानसेवा सुरु झाली आहे. या उभय शहरांदरम्यान स्टार एअरच्यावतीने आठवडयात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवसांमध्ये ही विमानसेवा असेल. 

मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे उद्घाटन

श्री सिंधिया आपल्या संबोधनात म्हणाले की, देशातील जनतेला रास्तदरात विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘उडान योजना’ सुरु केली आहे. आतापर्यंत देशातील ४३३ मार्गांवर ही सेवा सुरु झाली असून १ कोटींच्यावर जनतेने या सेवेचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले. मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर विमातळाच्या देशांतर्गत टर्मीनलचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे आश्वासनही श्री सिंधिया यांनी यावेळी दिले.                                                      

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.