रिपब्लिकन सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी श्री संजय देखणे साहेब यांची निवड करण्यात आली.

0 झुंजार झेप न्युज

रिपब्लिकन सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी श्री संजय देखणे साहेब यांची निवड करण्यात आली.

खेड,(प्रतिनिधी बबनराव खेसे): दि.13/10/2022 रोजी शिरोली येथील समाज मंदिरामध्ये जन आक्रोश भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांनी रिपब्लिकन सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी श्री संजय देखणे साहेब यांची निवड करण्यात आलेली त्याचा सत्कार समीतीचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री मारूती साबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ,तसेच नवनियुक्त महिला खेड तालुका अध्यक्षा सौ.आशाताई कुंटे यांचाही सत्कार करण्यात आला तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्ष सौ.रेश्मा शेख, पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप रंधवे यांचाही सन्मान करण्यात आला.त्या प्रसंगी काही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्ष प्रवेश करण्यात आले.

कार्यक्रमाला जन आक्रोश समीतीचे इतर पदाधिकाऱ्यांमध्ये सौ.मनीषा घोडेराव,मनोहर गोरगल्ले, संपादक श्री लहू लांडे,श्री राहूल सोनवने,संपादक पत्रकार बबन खेसे, श्री बाबासाहेब सोनवने, श्री बाबासाहेब घोडेराव,पारस साळके,भूषण सुर्यवंशी आदी.कार्यकर्ते उपस्थीत होते.त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेनेचे युवकचे जिल्हाध्यक्ष संदीप साळूंके, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद गवई, भोसरी विधानसभा अध्यक्षा उषा वाघमारे,लहू आमराळे आदी.रिपब्लीकन सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.