रेडझोनमधील बेकायदेशीरपणे बांधकामांवर कारवाई करण्यासाठी लाक्षणिक उपोषण!

0 झुंजार झेप न्युज

सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या नेतृत्त्वाखाली ऑटो क्लस्टर येथे उपोषण, विविध संघटनांचा पाठिंबा

पिंपरी चिंचवड,मोशी,दि.27: स्मार्ट सिटी अंतगत शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी स्मार्ट सिटी महाव्यवस्थापक मनोज सेठीया जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. बेकादेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई करण्यात येत नाही म्हणून स्मार्ट सिटी कार्यालय ऑटो क्लस्टर चिंचवड ह्या ठिकाणी सचिन काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पप्पू भोंडे, धर्मपाल हातागळे, गणेश पुरी, सोनवणे, रमेश वाघमारे, सचिन शिंदे यांनी उपस्थितीत राहून लाक्षणिक उपोषणास पाठिंबा दर्शविला.भक्ती शक्ती उद्यान समोर आण्णा भाऊ साठे बस स्टॉप शेजारी स्मार्ट सिटी अंतगत 15 वर्ष करारनामा विनामूल्य जागा देण्यात आली त्या ठिकाणी शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त व स्मार्ट सिटी महाव्यवस्थापक मनोज सेठीया यांना गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र त्या बेकायदेशीर बांधकामप्रकरणी कारवाई करण्यात यावी, तसेच बेकादेशीर बांधकाम पाडण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषणाचा पवित्रा घेण्यात आला. 

उपोषणास यांचा पाठिंबा

सदर लाक्षणिक उपोषणास आझमभाई पानसरे यांनी भेट देऊन पाठींबा दिला. तसेच स्मार्टसिटी अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंत जोगदंड, युवा कामगार जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे, सोनाली ताई वाघमारे, भिम शक्ती शिव शक्ती रिक्षा संघटना अध्यक्ष हैदर शेख, अविनाश वाघमारे-पाटील यांनी जाहिर पाठिंबा दिला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.