स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगाने आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा सन्मान

0 झुंजार झेप न्युज

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगाने आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा सन्मान

पिंपरी चिंचवड,दि.13: मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांना प्रथम क्रमांक तर ग प्रभागातील आदित्या बिर्ला हॉस्पिटल यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तसेच अ प्रभागातील आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटल यांना तृतीय पारितोषिक मिळाले आहे.या व्यतिरिक्त महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर चित्रकला, जिंगल, लघुचित्रपट, स्ट्रीट प्ले, म्युरल आणि वाल पेंटिंग अशा स्पर्धा देखील राबविण्यात आल्या होत्या. चित्रकला या स्पर्धेमध्ये अ,ब,क,ड,इ,फ,ग,ह क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातून अनुक्रमे, साहिल काळे, राही सोलंकी, राही वायाल, ज्ञान्सी यादव, साक्षी पवार, राजवर्धन पांडगळे, मानसी मकर यांनी मानांकन मिळवले आहे.

तसेच जिंगल स्पर्धेमध्ये ब क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातून एस.बी. पाटील पब्लिक स्कूल आणि नेहा खांडवले, श्रावणी कांबळे यांना प्रथम पारितोषिक मिळाले असून ग प्रभागातील महापालिकेच्या वाल्हेकरवाडी येथील मुलांची शाळा आणि ड प्रभागातील अश्पाक शेख यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे, तसेच ड प्रभागातील समीक्षा कुंभार, सायली गवळी यांना तृतीय पारितोषिक मिळाले आहे.लघुचित्रपट स्पर्धेमध्ये ब क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातून महापालिकेच्या वाल्हेकरवाडी येथील मुलांची शाळा यांना प्रथम क्रमांक, ग प्रभागातील सुनील पाटील यांना द्वितीय क्रमांक तर ब प्रभागातील चिंचवडेनगर येथील गुरुमैय्या स्कूल यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे.

स्ट्रीट प्ले स्पर्धेमध्ये अ प्रभागातून प्रतिभा महाविद्यालय, ब प्रभागातून एस.बी. पाटील पब्लिक स्कूल रावेत आणि महात्मा ज्योतीबा फुले या संस्थेला मानांकन मिळाले आहे. ड क्षेत्रीय कार्यालयातून श्री साई इंग्लिश स्कूल आणि महापालिकेच्या वैदुवस्ती शाळेला मानांकन मिळाले आहे, इ प्रभागातून यशस्वी प्रायमरी स्कूल, फ प्रभागातून संकेत देशमुख, ग प्रभागातून गोपीभाऊ कांबळे युवा फॉन्डेशन, ह प्रभागातून अमित बहिरट यांना मानांकन मिळाले आहे.म्युरल आणि वाल पेंटिंग स्पर्धेमध्ये अ प्रभागातून अबास हुसेन शेख, ब प्रभागातून विजय पवार, ड प्रभागातून नितीन खरात, इ प्रभागातून छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालय, ग प्रभागातून वैशाली पवार आणि ह प्रभागातून शुभम वाघमित्र यांना मानांकन मिळाले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२३ च्या अनुषंगाने शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, सी.एस.आर संस्था आणि नागरिक यांनी केलेल्या स्वच्छतेबाबच्या कार्याबद्दल त्यांचा स्वच्छता चॅम्पियन म्हणून गौरव करण्यात आला आहे. यामध्ये पठाण कियाक्त्बीन, कन्हैया सोलंकी, सुमेधबोधी वाघमारे, अनिल घनवट, नंदिनी गोरे, राहुल कदम, दिपाली गायकवाड, राधा सोलंकी, दत्तात्रय गुरव, पालाश सीएचएस च्या स्वाती कोरडे, मातृभूमी महिला बचत गटाच्या राजाबाई कसबे, इसीए चे गोरक्षनाथ सानप, धनलक्ष्मी महिला बचत गटाच्या संजीवनी डोंगरे, सुहासनी महिला बचत गटाच्या मनीषा गायकवाड, स्नेह फॉन्डेशन च्या सुधा भान, द्वारकासाई हेरीटेजचे शरद राठोड, पार्क रॉयलचे उदय साबळे, सदिच्छा महिला बचत गटाच्या राखी बालाजी, गुलमोहर कॉलनीतील ऋग्वेद गोसावी, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीकृष्ण फिरके, प्रेरणा महिला मंडळ आनंदवनच्या लक्ष्मी कापसे, शंतनू खंडाळकर, रघुनाथ शिंगटे, अपूर्वा चव्हाण, वैष्णवी पाटील, नवीन प्रल्हाद, शिवराम गावस, रामदास हिंगे, रोहित माळगे, रेश्मा बोरा, संगीता जोगदंड, रवींद्र इंगोले, सचिन खोले, यांचा समावेश आहे.तत्पूर्वी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेच्या वतीने क्षमता बांधणी व कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीत बदल घडवण्याच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत कॅम फॉन्डेशन मार्फत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी डॉ. अजित जगताप यांनी उपस्थित नागरिक, विद्यार्थी व कर्मचा-यांना योगाबाबत मार्गदर्शन केले.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.