इंद्रायणी थडी कार्यक्रम रद्द करण्यात यावा आचारसंहिता लागू करण्यात आली.असून त्याचा गैरफायदा चिंचवड विधानसभा मतदारसंघ उमेदवार यांना होण्याची दाट शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड,दि.22: भोसरी येथील गाव जत्रा मैदान या ठिकाणी सतरा एकर जागेमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी थडी कार्यक्रम आयोजित केला असून विविध प्रकारचे वीस पंचवीस कार्यक्रमाचे नियोजन असून हजर नागरिक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली. पोट निवडणुकीमुळे त्याचा गैरफायदा चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला होऊ शकतो मतदारांना इंद्रायणी थडी या ठिकाणी विविध प्रकारच्या दाखवून मतदार करण्यासाठी प्रवृत्त केले जाऊ शकते. तसेच आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या आमदार किंवा नेते मंडळी यांना खाजगी कार्यक्रम आयोजित करता येत नाही. विशेषता म्हणजे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थित राहणार असून पुणे जिल्हा अधिकारी मुख्य निवडणूक अधिकारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब दाखल घेऊन सदर कार्यक्रम रद्द करण्यात यावा.अशी मागणी सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.

