नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंती
पिंपरी चिंचवड,दि.23: महापालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता नितीन देशमुख , जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, देवेंद्र मोरे, वाशिम कुरेशी, अभिजीत डोळस, विनोद सकट, कर्मचारी महासंघाचे दिगंबर चिंचवडे, बालाजी अय्यंगार, नगरसचिव विभागाचे रावसाहेब राठोड आदी उपस्थित होते.

