पालकमंत्र्यांची जी-२० बैठकस्थळी असलेल्या प्रदर्शनाला भेट

0 झुंजार झेप न्युज

पालकमंत्र्यांची जी-२० बैठकस्थळी असलेल्या प्रदर्शनाला भेट

पुणे,दि.17: जी-२० बैठकीनिमित्त हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे आयोजित प्रदर्शनाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली. विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस सहआयुक्त संदिप कर्णिक आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.पाटील यांनी बैठकीसाठी चांगली तयारी केल्याबद्दल यावेळी प्रशासनाचे कौतुक केले.                  

पालकमंत्री पाटील यांनी प्रदर्शनातील विविध दालनात प्रदर्शित वस्तू, उत्पादने, योजना आदींबाबत संबंधितांशी चर्चा केली. बैठकीच्या निमित्ताने पुण्यातील उत्पादनांची माहिती परदेशातील प्रतिनिधींना करून देण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने स्थानिक उत्पादनांना ओळख मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुणे शहर आणि राज्याची क्षमता जगासमोर प्रदर्शित होत असल्याबद्दल श्री.पाटील यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी दालनाला भेट द्यायला आलेल्या प्रतिनिधींशीदेखील पालकमंत्र्यांनी संवाद साधला. राज्यातील पारंपरिक तृणधान्य व त्याच्या आहारातील महत्वाविषयी त्यांनी यावेळी चर्चा केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.