दिल्लीतील विविध मराठी संस्थांकडून कृती योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल : सांस्कृतिक कार्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार

0 झुंजार झेप न्युज

दिल्लीतील विविध मराठी संस्थांकडून कृती योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल : सांस्कृतिक कार्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार

                                                              

नवी दिल्ली,17 : दिल्लीतील विविध मराठी संस्थांकडून कृती योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिले.कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात दिल्लीतील विविध मराठी संस्थेशी सोमवारी संवाद साधताना श्री मुनगंटीवार बोलत होते. याबैठकीस केंद्रीय मानवधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, यांच्यासह विविध मराठी संस्थेचे पदाधिकारी तसेच केंद्र शासनाच्या विविध खात्यात प्रतिनियुक्तीवर असलेले मराठी अधिकारी, यासह सदनाचे आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी  उपस्थित होते.श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, महाराष्ट्राने अटकेपार झेंडा फडकथविलेला आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक खाणाखुणा आजही महाराष्ट्राबाहेर मोठया प्रमाणात दिसतात. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, खाद्यसंस्कृती, लोककलेची समृद्ध अशी परंपरा आहे. दिल्लीतील मराठी अधिकारी, येथे वास्तव्यास असलेले मराठी लोक हे समृद्ध परंपरा वाढवित आहेत. याचा अभिमान असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.  राजधानी दिल्लीत असणाऱ्या संस्थांनी दिलेल्या सूचनांवर विचार करून कृती योग्य सुचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन श्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले.

राजधानीत केंद्र शासनाच्या विविध आयोगात,  खात्यात महाराष्ट्र कॅडरचे तसेच इतर कॅडरचे मुळ महाराष्ट्रातील अनेक अधिकारी आहेत. यासह मुळ महाराष्ट्रातील मात्र, व्यवसाय- खाजगी नोकरी निमित्त आलेले मराठी लोक आज दिल्लीतील विविध भागात अनेक वर्षांपासून राहतात. त्यांनी येथे  विविध  संस्था उभारून  महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जोपासली आहे. यासोबतच सध्याच्या काळात विविध स्पर्धा परिक्षांसाठी येणाऱ्या तरूण मुला मुलींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या संस्था मदत करतात.या संस्थांना  येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. झाली. यातील काही महत्वाच्या सूचना ज्या माझ्या विभागाशी संबंधित असतील त्यांची वेगाने अंमलबजावणी केली जाईल, तर उर्वरित सूचनांवर संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे श्री मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.