प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रेतांवर कारवाई;पाच हजार दंड वसूल

0 झुंजार झेप न्युज

प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रेतांवर कारवाई;पाच हजार दंड वसूल

अकोला,दि.9: प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रेतांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्याअनुषंगाने आज शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. त्यात व्ही.एच.बी. कॉलनी गौरक्षण रोड, अकोला येथे धाडी दरम्यान 35 किलो प्रतिबंधीत नायलॉन मांजा जप्त करुन मांजा विक्रेताकडून पाच हजार रुपये दंड वसूल करुन कारवाई करण्यात आली. ही कारवाई जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदुषण नियंत्रण मंडळ व अनंतनंदाई सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांच्या पथकाव्दारे राबविण्यात आली. यामध्ये पोलिस विभागाचे संजय पारस्कर, बाबुराव देशमुख तसेच अमोल सोनोने, परेश धुमाळे, श्याम क्षिरसागर, कोमल कुतरमारे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.