महसुल विभागामार्फत ई-पीक पाहणीसाठी एक वैशिष्टपूर्ण नव्याने विकसित मोबाईल ॲप तयार करण्यात आले.

0 झुंजार झेप न्युज

महसुल विभागामार्फत ई-पीक पाहणीसाठी एक वैशिष्टपूर्ण नव्याने विकसित मोबाईल ॲप तयार करण्यात आले.

पुणे,दि.09: महसुल विभागामार्फत ई-पीक पाहणीसाठी एक वैशिष्टपूर्ण नव्याने विकसित मोबाईल ॲप तयार करणेत आलेला असून त्याचा सर्व शेतकर्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन दावडी येथील तलाठी श्री.एस.व्ही.शेळके यांनी दावडी येथे शेतकऱ्यांसमोर मार्गदर्शन करताना सांगितले.पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून घेण्याबाबत तसेच शेतकरी खातेदारांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मोबाईल ॲपची माहिती व प्रशिक्षण यावेळी तलाठी यांचेकडून उपस्थित शेतकरी बांधवांना देण्यात आले व युद्धपातळीवर सदर नव्याने सुधारित जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे पिकपाहणी नोंदविणे चालू असेलचे यावेळी सांगणेत आले.सदरची पीक पाहणी ॲपमध्ये दर हंगामामध्ये भरलेस शेतकरी पिक विमा,कृषी,बँक व सोसायटी कर्ज,पीक नुकसानभरपाई व तसेच शेतीपूरक सर्व योजनांसाठी उपयुक्त पडणार आहे.तसेच,सदर पीक पाहणी करताना सर्व वाडी वस्तीवर पोटखराब वर्ग1 मधील क्षेत्र जमीन धारकाने लागवडीखाली आणल्यास त्यास लागवडीखालील क्षेत्रात घेणेबाबतच्या परिपत्रकाबाबत माहिती देणेत आली व कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज भरून घेणेत आले.पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना ekyc करून घेणेबाबत मार्गदर्शन करणेत आले व अपूर्ण माहिती भरलेल्या अर्जदार यांचे online माहिती तलाठी स्तरावर भरून घेतलेने अनेक खातेदारांचे लाभ सुरु केले असून त्यांचे खात्यावर जमा केलेबाबतची माहिती तलाठी यांनी यावेळी दिली.वरील सर्व योजनांना उपस्थित सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला व तलाठी यांनी शासकीय सुट्टीच्या दिवशीदेखील तत्परतेने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

तसेच पूर्व भागातील सर्वात मोठे गाव असलेने खातेदार शेतकऱ्यांची संख्या अधिक असलेने सर्व 12 वाड्यांवर माहितीचे बोर्ड तयार करून युद्धपातळीवर उर्वरित खातेदार यांना आवाहन केले.तसेच,रब्बी हंगामातील ई पीक पहाणी,कलम 42ड,पोटखराब जमीन लागवडीखाली आणलेचा अहवाल,शेती जमिनीत अकृषिक परवानगी न घेता अकृषिक प्रयोजनाचा वापर करत असलेले जमिनीचे पंचनामा,शर्तभंग प्रकरणं,तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार झालेले नोंदीचे फेरफार नुसार आवश्यक पुराव्यासह 25% नजराणा भरुन व्यवहार नियमानुकूल करणेस अहवाल;याबाबतीत कामकाज दैनंदिन स्वरुपात होणार आहे.तरी सर्व खातेदारांनी वरील प्रमाणे सर्व योजनांचा लाभ घ्यावा याची सर्वांनी नोंद घ्यावी.उपस्थित खातेदार यांना प्रशिक्षित तलाठी मित्र/कृषी मित्र यांचे मार्फत वरील कामकाज करून घेणेबाबत आवाहन करणेत आले.पोटखराबा जवळपास 200-250 प्रकरणे पूर्ण...

42 ड मध्ये आजपर्यंत 35-40 नोटिसा इश्यू झाल्यात...

युद्धपातळीवर कामकाज चालू असून वस्तीप्रमाणे खातेदारांना auto generated परिशिष्ट फॉर्मवर सह्या घेऊन कामकाज होत असलेने रोजची अर्जांच्या आकडेवारीमध्ये वाढ होत आहे. एकुणात खूप चांगला प्रतिसाद ग्रामस्थांकडून मिळत आहे.अजूनही उर्वरित 700-750 हेक्टर पोटखराबा क्षेत्रावरील 1000-1200 शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेनेची संधी मिळणार असलेबाबतची माहिती तलाठी शेळके यांनी यावेळेस दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.