आमदार नितेश राणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक- पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार

0 झुंजार झेप न्युज

आमदार नितेश राणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक- पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार

पिंपरी चिंचवड.दि.12: भोसरी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी अतिशय असभ्य भाषेत टीका केली. "कोणत्याही पक्षाच्या सन्माननीय सदस्याबद्दल बोलणे चुकीचे असून" या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कविता आल्हाट यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवतडे यांची भेट घेऊन अध्यक्षा कविता आल्हाट यांनी तक्रार दिली. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, आमदार नितेश राणे यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर चुकीचे व अत्यंत खालच्या थराला जाऊन गलिच्छ असे विधान केले आहे. 

डॉ. कोल्हे यांच्या सामाजिक कार्याचा विसर पडत, विखारी आकसापोटी अशी गरळ ओकणा-या राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा . तसेच राणे यांनी आपल्या या बालिश बुध्दीचा विचार करून आमदार पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आल्हाट यांनी दिला आहे. उपस्थित कविता खराडे, पुनम वाघ, संगीता कोकणे, मीरा कदम ,दीपा देशमुख, सुरेखा माळी ,माधवी सोनार,असंसदीय भाषा वापरून कोणत्याही व्यक्तीच्या आजवरच्या कार्याला बदनाम करणे अतिशय चुकीचे आहे.अशा व्यक्ती आणि प्रकृती दोन्हींचा निषेध करावा तेवढा कमीच आहे म्हणूनच आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.