माता रमाई आंबेडकर यांची विहामांडवा येथे जयंती साजरी

0 झुंजार झेप न्युज

माता रमाई आंबेडकर यांची विहामांडवा येथे जयंती साजरी

पैठण,(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): तालुक्यातील विहामांडवा येथील विवेकानंद इन्फोटेक येथे माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ् या राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती.7 फेब्रुवारी 1818 मध्ये वंदनगाव येथे त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात जन्म झाला होता,त्या काळात रमाईचे संपूर्ण जीवन हे संघर्षात गेले. ज्यावेळी बाबासाहेब अस्पृश्यांच्या न्यायासाठी दिवस-रात्र एक करून लढत होते.

त्यावेळी रमाईने कोणतीही तक्रार न करता अत्यंत कष्टाने संसाराचा गाडा हाकत बाबासाहेबांना नेहमी प्रोत्साहन दिले. बाबासाहेब परदेशी असताना अनेक अडचणींचा रमाबाईंना तोंड द्यावे लागले. परंतु एका त्यागमूर्ती प्रमाणे त्यांनी आपल्या पतीपर्यंत त्यांच्या दुःखाची कसलीच झळ पोहचू दिली नाही. 28 वर्ष रामाईने बाबासाहेबांना साथ दिली.या त्यागमुर्तीची आज जयंती साजरी करण्यात आली यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर, पत्रकार शब्बीरभाई शेख, ग्रा सदस्य पंडित धायकर, विवेकानंद इन्फोटेक संचालक सतीश गाभूड सर,शालेय समिती सदस्य नितीन ब्रह्मराक्षस, राहुल हॉटेलचे मालक कृष्णा नागवे,पञकार शफिक शेख,भाऊसाहेब डुकरे,गवारे,लवांडे, चिंचाळेचे येवले उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.