भाजप पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस सचिन काळेभोर यांची नियुक्ती करण्यात आली.
पिंपरी चिंचवड,दि.18: पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र २००० यार्ड रद्द करण्यात यावे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ह्यांना पुणे दौऱ्यावर काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येईल म्हणून इशारा दिला होता तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येईल म्हणून इशारा देण्यात आला होता त्या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत असून त्या मुळे भारतीय जनता पार्टी पक्षातून मला निलंबित केले होते नवनियुक्त अध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांनी मला पुन्हा भारतीय जनता पार्टी पक्षात काम करण्याची संधी दिली असून त्या मुळे समाधान व्यक्त करण्यात येत.
असून शहरातील साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्याचा प्रश्न तसेच रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र कमी करण्यात यावे म्हणून पाठपुरावा करण्यात येणार आहे निगडी येथील सेक्टर 22 मधील जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना प्रकल्प स्थगिती आदेश उठवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांना लेखी पत्राद्वारे मागणी करण्यात आली असून त्या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे पात्र लाभार्थी ह्यांना घरकुल मधील घर मिळवण्यासाठी पायपीट करावी लागत असून १२/१३ वर्ष पात्र लाभार्थी वंचित राहिले आहे त्या संदर्भात जोरदार भुमिका घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे सचिन काळभोर चिटणीस भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर

