सेक्टर २२ काळभोर गोटा रस्ता दुरुस्ती काम बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे

0 झुंजार झेप न्युज

सेक्टर २२ काळभोर गोटा रस्ता दुरुस्ती काम बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.

पिंपरी चिंचवड,दि.01: निगडी येथील सेक्टर २२ काळभोर गोटा रस्ता दुरुस्ती काम एक महिन्यापासून सुरू असून गेल्या आठ दहा दिवसांपासून सदर काम बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे काळभोर गोटा शेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ शाळा असून एक हजार शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत तर शेजारी महिला प्रस्तुती रुग्णालय असून त्या ठिकाणी महिला प्रस्तुती करण्यासाठी ह्या रस्त्याचा वापर करत असून त्या ठिकाणी अमृत योजनेअंतर्गत रस्ता दुरुस्ती काम बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.

काळभोर गोटा रस्ता खोदून ठेवल्यामुळे साहजिकच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी ह्या रस्त्यावर जाण्यासाठी येण्यासाठी कसरत करावी लागत आहे अपघात होण्याची दाट शक्यता असून त्या ठेकेदार ह्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच लवकरात लवकर सदर काम संपुर्ण करण्यात यावे ही नम्र विनंती माझी नगरसेवक टक्के वारी मुळे पाठपुरावा करत नाही त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.