क्रांंतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्सहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर,दि.04: जि.प.प्रशाला मुलांची पैठण येथे आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी प्रशालेतील विद्यार्थी,सोमनाथ वाघ,तन्मयसिंह परदेशी,अयान शेख,प्रदिप जोंधळे,नागेश घोरपडे,मारिया शेख,अलमिरा अत्तार,फरहिन शेख,या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.तर ताराचंद हिवराळे यांनी स्ञी शिक्षणाचे महत्त्व व आजच्या काळात स्ञिया मनुष्याच्या खांद्याला खांद्या लावुन चालत आहेत ते केवळ आणि केवळ शिक्षणामुळे,शिक्षण हे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. तर वैशाली कुटे यांनी आपल्या भाषणातून असे सांगितले की 'पार करुन अनंत अडथळे,शिकविलेस तु स्ञियांना, नतमस्तक होतो आम्ही सावित्री बाई थोरवी तुझी गातांना.
यावेळी,रुमाना बेलदार व अलीना बेग,या विद्यार्थींनिंनी साविञीबाई फुले यांची भुमिका साकारली.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष:-प्रशालेचे मुख्याध्यापक,अंकुश गाढे होते. तर,प्रमुख पाहुणे-जेष्ठ माध्यमिक शिक्षिका,वैशाली कुटे,एन.सी.सी. मेेजर,ताराचंद हिवराळे,ऊर्दू विभाग प्रमुख,शेख फैय्याज हे होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन, आफिया बेग,या विद्यार्थींनींने केले.तर अभार प्रदर्शन,समशेर पठाण यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,ऊस्मान बागवान,गणेश थोटे,ज्योती बलखंडे,शेख चाँद यांनी परिश्रम घेतले.

