डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य सामाजिक उपक्रम; मोफत आरोग्य शिबिर व साहित्य वाटप
पिंपरी चिंचवड,पुणे : युवा कामगार सेना पुणे जिल्हा तसेच आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक ग्रामीण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच मोफत नेत्र तपासणी करून गरजू नागरिकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यात आला.
याशिवाय, उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना थंडगार पेय व पाण्याच्या बाटल्यांचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष रमेश ब्रम्हा , संयोजक समितीचे मिनीनाथ भोईटे, संजय हरळे, विनोद सोनवणे, गौतम मोरे, संदेश धायकर, सुरज मुंडे, करण नाईक, अरुण मुकणे, सोनू दिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
