प्रभाग १३ निगडी गावठाणात राजकीय खळबळ; सचिन काळभोर यांना पोलिसांची नोटीस

0 झुंजार झेप न्युज

 प्रभाग १३ निगडी गावठाणात राजकीय खळबळ; सचिन काळभोर यांना पोलिसांची नोटीस

पिंपरी-चिंचवड : शहरातील प्रभाग क्रमांक १३, निगडी गावठाण परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपशी संबंधित कार्यकर्ते सचिन सुदाम काळभोर (वय ४०) यांना निगडी पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काळभोर यांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत प्रभागातील कार्यकर्त्यांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी थेट निवड करण्याची मागणी त्यांनी पुढे आणल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे स्थानिक पातळीवर नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी निगडी पोलिस स्टेशनकडून काळभोर यांना नोटीस देण्यात आली आहे. नोटीसमध्ये कोणत्याही बेकायदेशीर कृतीपासून दूर राहण्याचा आणि सर्व मागण्या कायदेशीर मार्गानेच मांडण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

पोलिस प्रशासनाने आवश्यकतेनुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले असून, ही नोटीस भविष्यात पुरावा म्हणून वापरण्यात येऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

👉 या घटनेमुळे निगडी गावठाण परिसरात राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे असून, आगामी काळात या प्रकरणाचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.