सातारा जिल्ह्यात शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हातचलाखी व बतावणी करून फरार असलेला सराईत इराणी आरोपी शिवाजीनगर पुणे पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी चिंचवड दि.06 : दिनांक ०४/०४/२०२६ रोजी शाहुपुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्र. ४८/२०२६ बी.एन.एस. कलम ३४(४) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेजमधील अनोळखी संशयित आरोपीचे फोटो हे पोलीस स्टेशन अंमलदार यांच्याकडून गुप्त बातमीदारांना देण्यात आले होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस हवालदार संतोष मेमाणे, पोलीस नाईक जाधव, पोलीस अंमलदार कडू, पोलीस अंमलदार झांबरे असे शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, सदर आरोपी हा इराणी वस्ती, शिवाजीनगर पुणे येथे राहणार आहे.
त्यानुसार पोलीस स्टाफने आरोपीच्या घरी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आला व त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २७/०३/२०२६ रोजी आयडीबीआय बँक, प्रतापगंज पेठ, सातारा येथील एका वृद्ध महिलेकडून हातचलाखी करून ५०००/- रुपये काढून घेतल्याची कबुली दिली.
त्यानंतर आरोपीस शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आणून शाहुपुरी पोलीस ठाणे सातारा यांच्याशी संपर्क साधून त्यांना ताब्यात देण्यात आले. पुढील तपास शाहुपुरी पोलीस स्टेशन करत आहेत.
आरोपी नाव – इब्राहिम बाबू इराणी
याने यापूर्वी देखील नागरिकांची फसवणूक व चोरी केल्याचे गुन्हे पुणे ग्रामीण, पुणे शहर, रायगड इत्यादी ठिकाणी केलेले आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ १ पुणे शहर मा. श्री. चंद्रकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिवाकर, अपर काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. प्रमोद पाटील पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार संतोष मेमाणे, पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस अंमलदार महेंद्र कडू, रोहित झांबरे यांच्या पथकाने कामगिरी केली.
