शहराचे सौंदर्य व स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन

0 झुंजार झेप न्युज

 शहराचे सौंदर्य व स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावेआयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन

शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा दिला इशारा


पिंपरीदि. ६ एप्रिल २०२६ :- पिंपरी चिंचवड शहराचे सौंदर्य आणि शिस्तबद्धता जपणे ही प्रशासनासोबत नागरिकांचीही प्राथमिक जबाबदारी आहे. अनधिकृत जाहिरात फलकबॅनर्स महावितरण / टेलिफोन डीपी वर चिटकवलेल्या जाहिराती आणि भिंतींवरील जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून अशा प्रकारांना कोणतीही सहनशीलता दाखवली जाणार नाही. तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षकांना संबंधितांवर कठोर कारवाई करून जाहिरातदारांना नोटिसा देऊन दंडात्मक कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तरी नागरिक आणि जाहिरातदारांनी नियमांचे पालन करून महापालिकेला सहकार्य करावेअन्यथा अनधिकृत फलक हटवून दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईलअसा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतरित्या लावण्यात येणारे जाहिरात फलकबॅनर्सफ्लेक्स तसेच दूरध्वनी खांबमहावितरण डीपी आणि सार्वजनिक भिंतींवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. हे रोखण्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकारीविभागप्रमुख आणि बीट निरीक्षक यांच्या मार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमित पाहणी करून अनधिकृत फलकबॅनर्सफ्लेक्स त्वरित हटवावेत. तसेच अशा महावितरण डीपी /भिंतीवरील जाहिरातींवर नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधून संबंधित जाहिरातदारांना नोटिसा बजवाव्यातअशा कंपन्यांवर शहर विद्रुपिकरणाबद्दल सक्त कारवाई करावी अशा सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.

याशिवायकोणत्याही प्रकारचे अनधिकृत जाहिरात फलकबॅनर्स अथवा भिंतींवरील जाहिराती लावणे हा नियमबाह्य प्रकार असून संबंधितांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व इतर लागू कायद्यांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार फलक तत्काळ हटवून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईलअसा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

कोट

नागरिक आणि जाहिरातदारांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे. अनधिकृतरित्या जाहिरात फलक किंवा बॅनर्स लावणे टाळावे. अन्यथा संबंधित फलक हटवून त्वरित दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच महापालिका प्रशासन शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि शिस्तबद्ध जाहिरात व्यवस्थेसाठी कटिबद्ध असून सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

-           डॉ. विजय सूर्यवंशीआयुक्तपिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.