“जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या!” – सचिन काळभोर यांचा इशारा; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना ‘घंटा भेट’
पिंपरी चिंचवड दि.12: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे जुने कार्यकर्ते आक्रमक झाले असून, सचिन काळभोर यांच्या नेतृत्वाखाली मोठी हालचाल सुरू झाली आहे. स्वीकृत नगरसेवक पदांवर सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कार्यकर्ते आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
👉 दि. १३ एप्रिल २०२६ | सकाळी ११ वाजता | ‘वर्षा’ निवासस्थानी ‘घंटा भेट’ आंदोलन
सचिन काळभोर यांची ठाम भूमिका:
जुन्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदांवर त्वरित संधी द्या
पक्षासाठी झटणाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे
नवीन व जवळच्या कार्यकर्त्यांना दिले जाणारे प्राधान्य थांबवा
कार्यकर्त्यांनी नागरी समस्या सोडवण्यासाठी सातत्याने मोर्चे व आंदोलने केली, तरीही त्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप आहे. यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

