बलात्कार घटनेतील गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हावी - चेतन पवार

0 झुंजार झेप न्युज

 बलात्कार घटनेतील गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हावी - चेतन पवार


पिंपरी, पुणे,दि.31 : वाकड पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवारी झालेल्या बलात्कार घटनेतील गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हावी यासाठी तपास जलद गतीने पूर्ण करावा. तसेच अल्पवयीन पीडित मुली व तिच्या कुटुंबियास शासकीय सहाय्य ताबडतोब मिळावे यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख चेतन पवार यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे यांच्याकडे केली. मंगळवारी, चेतन पवार यांनी शिष्टमंडळासह या घटनेतील तपास पोलिस अधिकारी यांची भेट घेऊन पत्र दिले. यावेळी ज्येष्ठ नेते मानव कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिवसेनेच्या जिल्हा संघटिका अनिता तुतारे, उपजिल्हा संघटिका कल्पना शेटे तसेच योगिनी मोहन, तस्लिम शेख, गीता कुसाळकर, कमल गोडांबे, वंदना खंडागळे, श्रद्धा शिंदे, सिद्दिकी शेख, अमर सोनवणे, स्वप्निल बनसोडे, अश्विन ढमाले, सुमित निकाळजे आदी उपस्थित होते. 
      
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना चेतन पवार यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने शाळा महाविद्यालय सार्वजनिक ठिकाणी झोपडपट्टी परिसरात दिवसा तसेच रात्री गस्त वाढवावी, मार्शल तसेच दामिनी पथक यांना क्रियाशील करावे. अशा घटना म्हणजे शहराच्या संस्कृतीला डाग लागल्यासारखे आहे. अल्पवयीन मुली, महिला  यांच्यावर अन्याय, अत्याचार करण्याचे धाडस कोणीही करू नये असा पोलिसांचा वचक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर बसला पाहिजे. या गटनेतील पीडित कुटुंबाला ताबडतोब साह्य मिळावे यासाठी आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे असे चेतन पवार यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.