वाल्हेकरवाडी परिसरात इलेक्ट्रिक दुचाकींना आग अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे आग आटोक्यात, दोन महिलांचे वाचविले प्राण

0 झुंजार झेप न्युज

वाल्हेकरवाडी परिसरात इलेक्ट्रि दुचाकींना आग अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे आग आटोक्यात, दोन महिलांचे वाचविले प्राण 


पिंपरी, दि. २० जुलै २०२६: वाल्हेकरवाडी येथील दगडोबा चौक परिसरात सोमवारी सकाळी निवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींना अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड हानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तीन अग्निशमन वाहनांच्या सहाय्याने युद्धपातळीवर बचावअग्निशमन कार्य हाती घेतले.


प्राथमिक माहितीनुसार, चार्जिंगदरम्यान लागलेल्या आगीने अल्पावधीतच भीषण रूप धारण केले. या गीत तीन इलेक्ट्रिक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या. त्यानंतर आगीने शेजारील दोन मजली इमारतीलाही वेढा दिला. आग लागल्यानंतर इमारतीच्या पहिल्यादुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोन महिलांची अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडसानेसुरक्षित सुटका केली. ग्निशमन दलाच्या तत्पर आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी टळली.

 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारीकर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच आग परिसरातील इतर ठिकाणी पसरू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्या आले. अग्निशमन दलाच्या वेगवान प्रतिसादामुळे आग अधिक वाढण्यापासून रोखण्यात यश आले. 


याप्रसंगी उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली लीड फायरमन विनायक नाळेशहाजी कोपनर तसेच फायरमन प्रल्हाद कोरडे, पंकज रसाळ, अमोल कुऱ्हाडे, इरफान बेलदार, एकनाथ ढगे, सखाराम चिमटे, भूषण येवले, तुषार बिरहाडे, सोहन तुकदेव, प्रकाश गव्हाणे, तेजस्वी पाटील, एकनाथ बुधवंत, सागर लावंडे, सागर गुरव, राहुल धुमाळ, महेश गरड, बालाजी सानप आदी कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी आणि बचावकार्य यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. 


निवासी इमारतींमध्ये चार्जिंग रताना आवश्यक ती खबरदारी घेतल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकता. पिंपरी चिंचवड महापालिकेचे ग्निशमन दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव सज्ज असून, या टनेत जवानांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे दोन महिलांचे प्राण वाचविण्यात यश आले. तसेच आपत्काली परिस्थितीत नागरिकांनी घाबरूनजाता त्वरित १०१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.