मोशीतील वायू प्रदूषणाची महापौरांकडून तातडीने दखल; प्लास्टिक व टायर जाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

0 झुंजार झेप न्युज

मोशीतील वायू प्रदूषणाची महापौरांकडून तातडीने दखल; प्लास्टिकटायर जाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

पिंपरी-चिंचवड दि. २० : मोशी परिसरातील विष्णू ग्रीन्स सहकारी गृहरचना संस्थेतील नागरिकांनी परिसरात वारंवार प्लास्टि, टायरइतर भंगार जाळल्यामुळे निर्माण होत असलेल्या गंभीर वायू प्रदूषणाबाबत महापौर रवि लांडगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाची महापौरांनी तातडीने दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.


मोशी परिसरातील वाढत्या धूर, दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर हो असलेल्या दुष्परिणामांकडे लक् वेधत महापौर रवि लांडगे यांनी संबंधित विभागांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली.

 

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, "नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाची सुरक्षितता ही महापालिकेची सर्वोच्च जबाबदारी आहे. शहरा कोणत्याही परिस्थितीत प्रदूषण करणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घातले जाणार नाही. स्वच्छ हवा, निरोगी पर्यावरण आणि सुरक्षित जीवनमान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तो अबाधित राखण्यासाठी प्रशासनामार्फत कठो आणि प्रभावी कारवाई केली जाईल."


यावेळी मा. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे तसेच कविता आल्हा उपस्थित होत्या. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पाहणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच अनधिकृत भंगार साठे हटविणे, प्लास्टिकटायर जाळणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवा करणे आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले.


महापौरांच्या पुढाकारानंतर मोशी परिसरातील वायू प्रदूषणाच्या मस्येवर तातडीने प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या असून, नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर राबविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.