‘शून्य कचरा शाळा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होणार – महापौर रवि लांडगे

0 झुंजार झेप न्युज

 शून्य कचरा शाळाउपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होणार महापौर रवि लांडगे 


भोसरी, दि.21 जुलै : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या इंग्लिश मीडियम शाळा, भोसरी येथे आसरा सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्याशून्य कचरा शाळाप्रकल्पाला पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर रवि लांडगे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 


यावेळी विद्यार्थ्यांशी पर्यावरण संवर्धन, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि स्वच्छतेच्या सवयी लहानपणापासूनच अंगीकारण्याच्या महत्त्वाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. शून्य कचऱ्याची संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले. 


महापौर रवि लांडगे म्हणाले, "स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. त्याची सुरुवात विद्यार्थ्यांपासून झाली तर भविष्यात पर्यावरणाबाबत संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडतील. शाळांमध्ये राबविण्यात येणारे असे उपक्रम स्वच्छतेची सवय, कचरा व्यवस्थापनाची जाणीव आणि पर्यावरण संरक्षणाची भावना अधिक दृढ करतात. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरात आणि परिसरातही शून्य कचऱ्याचा संदेश पोहोचवावा."

 

यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, लासुका कचरा वर्गीकरण, पुनर्वापर आणि स्वच्छ परिसर राखण्याबाबत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे महापौरांनी कौतुक केले.


या प्रसंगी आसरा सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या अर्चना मोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता डिसुजा, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.