"विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांचा नांदेड मनपाकडून भव्य सत्कार;,आयुक्तपदाच्या धडाकेबाज कार्यकाळाला मिळाला उजाळा"

0 झुंजार झेप न्युज

 "विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांचा नांदेड मनपाकडून भव्य सत्कार;,आयुक्तपदाच्या धडाकेबाज कार्यकाळाला मिळाला उजाळा"

छत्रपती संभाजीनगर,दि.25 : विभागाचे नवनियुक्त *विभागीय आयुक्त जी.श्रीकांत* यांचा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार दि.२४.०७.२०२६ रोजी एक भव्य आणि भावपूर्ण सत्कार सोहळा पालिकेच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जी.श्रीकांत यांनी नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून केलेल्या ऐतिहासिक आणि धडाकेबाज कार्यकाळातील आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यात आला.
नांदेड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभागृहात आयोजित या विशेष सोहळ्यात विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या प्रसंगी *महापौर सौ.कविता संतोष मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभागृह नेते महेश कनकदंडे, महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, माजी सभापती किशोर स्वामी* यांच्यासह विविध प्रभगाचे नगरसेवक, विद्यमान अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, कर्मचारी व माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी जी.श्रीकांत यांच्या प्रशासकीय कौशल्याचे आणि नांदेड शहराच्या विकासातील त्यांच्या योगदानाचे भरभरून कौतुक केले.
कार्यकाळातील कामांना उजाळा
जी.श्रीकांत यांनी नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सांभाळलेली धुरा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि लोकहितैषी राहिली आहे. सत्कार सोहळ्यादरम्यान त्यांच्या कार्यकाळातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा आणि प्रकल्पांचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. त्यात प्रामुख्याने नांदेड शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे काम त्यांच्या काळात गतीने झाले. महानगरपालिकेच्या कामकाजात प्रशासकीय शिस्त, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करतांना आपल्या प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर थेट संपर्काच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी त्यांनी राबवलेल्या विशेष मोहिमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, असे सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले.
जी. श्रीकांत यांचे भावूक मनोगत
सत्काराला उत्तर देताना विभागीय आयुक्त जी.श्रीकांत अत्यंत भावूक झाले होते. त्यांनी नांदेडकरांनी आणि मनपा परिवाराने दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या भाषणात ते म्हणाले: "नांदेड शहराशी आणि येथील नागरिकांशी माझे एक वेगळेच भावनिक नाते जडले आहे. नांदेड शहरात माझ्या आयुष्यातील महत्वाचे टप्पे मी सर केले आहेत.नांदेड महानगरपालिकेत काम करताना आलेले अनुभव माझ्या प्रशासकीय प्रवासातील अत्यंत महत्त्वाचे पाऊल होते. आज विभागीय आयुक्त म्हणून काम करतानाही नांदेडच्या विकासासाठी आणि येथील जनतेच्या हितासाठी मी नेहमीच तत्पर राहीन."
समग्र विकासाची ग्वाही
या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण महानगरपालिका प्रशासनाने व पदाधिकाऱ्यांनी जी.श्रीकांत यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर, त्यांच्या अनुभवाचा लाभ नांदेडसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी होईल,असा विश्वास याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.या सोहळ्यामुळे मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एक नवा उत्साह पाहायला मिळाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.