पुणे शहर उद्यानाच्या सर्वांगीण विकास करण्याच्या अनुषंगाने मा. महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम यांचे मार्गदर्शनाखाली मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी कै. विठाबाई पुजारी उद्यान, महर्षीनगर या उद्यानाची आज समक्ष पाहणी केली.

0 झुंजार झेप न्युज

पुणे शहर उद्यानाच्या सर्वांगीण विकास करण्याच्या अनुषंगाने मा. महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम यांचे मार्गदर्शनाखाली मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी   कै. विठाबाई पुजारी उद्यान, महर्षीनगर या उद्यानाची आज समक्ष पाहणी केली. 

पिंपरी चिंचवड,दि.२९ : सदर पाहणीदरम्यान उद्यानाची सुरक्षितता, सीमा भिंती, तलावातील गाळ, नागरिकांसाठी शौचालय सुविधा, प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, रखवालदारांसाठी निवास व्यवस्था तसेच उद्यानातील वृक्षांविषयी नागरिकांना माहिती उपलब्ध करून देणे या विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी मा. अतिरिक्त आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे सूचना दिल्या :

• उद्यानासंदर्भातील न्यायालयीन बाबींवर विधी विभाग, बांधकाम विभाग व मालमत्ता विभागाशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
• नागरिकांचा अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी उद्यानाच्या सीमा भिंतीवर आवश्यक ठिकाणी कॉन्सर्टिना तार बसविण्यात यावी.
• उद्यानाच्या सीमा भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून भिंत धोकादायक असल्यास ती पाडून त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मजबूत काँक्रीटची भिंत उभारण्यात यावी.
• उद्यानातील तलावातील गाळ काढण्याचे काम येत्या उन्हाळी हंगामात नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात यावे.
• नागरिकांच्या सोयीसाठी उद्यानामध्ये अत्याधुनिक शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. पुरुष, महिला व दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी.
• उद्यानाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रखवालदार सेवकांच्या वास्तव्यासाठी निवास्थान योग्य पद्धतीने विकसित करण्यात यावे.
• उद्यानातील प्रकाश व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी विद्युत पोल बसविताना आवश्यकतेनुसार अधिक उंचीचे पोल बसविण्यात यावेत.
• उद्यानाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.
• नागरिकांना उद्यानातील विविध वृक्षांविषयी शास्त्रीय व उपयुक्त माहिती मिळावी यासाठी  संबंधित वृक्षांवर माहिती फलक अथवा QR Code उपलब्ध करून देण्यात यावेत.

उद्यानाचा विकास सुरक्षित, सुशोभित व नागरिकाभिमुख पद्धतीने होण्यासोबतच नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वरील सर्व बाबींवर नियोजनबद्ध आणि वेळबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

सदर पाहणीसाठी खालीलप्रमाणे मा.सभासद व अधिकारी उपस्थित होते.

१. मा.श्री प्रसन्नजीत वैरागे, सभासद, पुणे मनपा
२. डॉ. अशोक घोरपडे, सह महापालिका आयुक्त
३. श्री. संतोषकुमार कांबळे, उद्यान अधीक्षक
४. श्री. राहुल साळुंखे, कार्यकारी अभियंता
५. श्रीमती आरती नाथी, कार्यकारी अभियंता
६. श्रीमती भाग्यश्री चौगुले, उपअभियंता
७. श्री. अमित शेटे, उपअभियंता

तसेच उद्यान विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.