भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापनदिन महापालिकेत साजरा

0 झुंजार झेप न्युज


 भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापनदिन महापालिकेत साजरा

महापौर सौ.कविता संतोष मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन दिनांक १५.०८.२०२६ रोजी सकाळी ८.०५ वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहण सोहळ्याची सुरुवात वंदे मातरम या राष्ट्रगीताने करण्यात आली, ध्वजारोहण संपन्न झाल्यावर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगान व राज्यगीत गायले तसेच पोलीस दलाने व अग्निशमन दलाने झेंड्यास सलामी दिली. याप्रसंगी महापौरांनी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. नांदेड शहराचा सर्वांगीण विकास करणे, शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवणे हीच खऱ्या अर्थाने देशाची सेवा ठरेल, असे त्यांनी नमूद केले.तसेच मनपा आयुक्तांनी आपल्या संदेशात सांगितले की, स्वातंत्र्यदिनाच्या या अमृतोत्तर सुवर्ण महोत्सवी टप्प्यावर पालिकेची संपूर्ण यंत्रणा नागरिकांना अधिक गतीने आणि पारदर्शकपणे सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. शहराच्या विकासकामांना गती देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी मनपाचे उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेता महेश कनकदंडे, शिक्षण, महिला व बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, उपभापती निरंजना लांडगे, गटनेता संदीपसिंग गाडीवाले, मसूद खान, प्रशांत इंगोले, साबेर चाऊस, माजी पदाधिकारी व सन्माननीय सदस्य,अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अभिजीत वायकोस, नितीन गाढ़वे, स.अजितपालसिंघ संधु, गंगाधर ईरलोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, शहर अभियंता सुमंत पाटील, नगरचनाकार ओम लहाने, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, दिलीप टाकलीकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिट्ठे, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, क्रीडा अधिकारी रमेश चौरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रईसोद्दीन, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग,शिक्षण अधिकारी प्रवीणा मांदळे, उपअभियंता प्रकाश कांबळे, सतीश ढवळे, खुशाल कदम, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे,राजेश जाधव, गौतम कवडे, नागनाथ पतंगे, विठ्ठल तिडके व अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे, मालमत्ता व्यवस्थापक पद्माकर कावळे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे तसेच महापालिकेतील ईतर अधिकारी व कर्मचारी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मनपाच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने करण्यात आ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.