पुणे मशीन टूल एक्स्पो 2026 आणि फॅक्टेक (FACTEQ) 2026 चे पुण्यात उद्घाटन; आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि उद्योगातील नव्या संधींचे प्रदर्शन

0 झुंजार झेप न्युज

 11 हजार चौरस मीटरच्या प्रदर्शनात 175 हून अधिक कंपन्या, 300 व्यावसायिक प्रतिनिधी आणि 18 हजारांहून अधिक अभ्यागत एकत्र येणार



पुणे, भारत,दि.09 : इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IMTMA) यांच्या वतीने आयोजित पुणे मशीन टूल एक्स्पो (PMTX) 2026 आणि त्यासोबत आयोजित फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पो (FACTEQ) 2026 चे आज पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC), मोशी, पुणे येथे उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडचे उपाध्यक्ष श्री. अरविंद गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमाला आयएमटीएमएच्या अध्यक्षा सुश्री मोहिनी केळकर, आयएमटीएमएचे उपाध्यक्ष श्री. विक्रम साळुंके आणि आयएमटीएमएचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (DG & CEO) श्री. जिबाक दासगुप्ता हे उपस्थित होते.
पुण्यात हे प्रदर्शन आयोजित करण्याच्या आयएमटीएमएच्या निर्णयाबाबत बोलताना श्रीमती मोहिनी केळकर म्हणाल्या, “महाराष्ट्रात भारतातील सर्वात मजबूत मशीन टूल उद्योग व्यवस्था आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक आणि कोल्हापूर येथे महत्त्वाचे औद्योगिक समूह आहेत. पुणे हे ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग कंपन्यांचे प्रमुख केंद्र असल्याने येथे उच्च अचूकतेच्या उत्पादन तंत्रज्ञानाची मोठी गरज आहे. ही गरज मशीन टूल उद्योग पूर्ण करतो. महाराष्ट्रात आयएमटीएमएची मजबूत उपस्थिती असून, संस्थेचे सुमारे 180 सदस्य आहेत. गेल्या दोन दशकांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून आयएमटीएमए उद्योगांना सातत्याने सहकार्य करत आहे.”
श्रीमती केळकर यांच्या मतांशी सहमती दर्शवत आयएमटीएमएचे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जिबाक दासगुप्ता म्हणाले, “पुणे हे विविध उत्पादन उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे या भागातील उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी आयएमटीएमए कडून पीएमटीएक्स आणि फॅक्टेक (FACTEQ) प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक आवृत्तीसोबत या प्रदर्शनांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. मशीन टूल्सचे उत्पादक आणि त्यांचा वापर करणाऱ्या कंपन्यांकडूनही या प्रदर्शनांना मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.”
अधिक माहितीसाठी www.mtx.co.in आणि www.facteq.in या संकेतस्थळांना भेट द्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.