गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पदपथ, स्वच्छता, विद्युत सुरक्षा आणि विसर्जन व्यवस्थेला प्राधान्य देण्याचे दिले निर्देश
पिंपरी चिंचवड,दि.01: गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विद्युत तारा व जोडण्यांची सुरक्षितता तपासून धोकादायक जोडण्यांवर संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने कार्यवाही करावी. कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था वेळेत पूर्ण करावी. तसेच प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी. पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करावेत, सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता, झाडांची छाटणी आणि रस्त्यांची दुरुस्ती वेळेत पूर्ण करावी. बीट निरीक्षकांमार्फत अनधिकृत बांधकामांवर बारकाईने लक्ष ठेवून तातडीने निष्कासनाची कार्यवाही करावी, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आगामी गणेशोत्सव तसेच शहरातील विविध नागरी सुविधांच्या अनुषंगाने आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांनी संबंधित विभागप्रमुख व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, स्वच्छता व्यवस्था, रस्ते व पदपथांची स्थिती, विद्युत सुरक्षाव्यवस्था, उद्याने, गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी तसेच नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देताना आयुक्त बोलत होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, प्रेरणा सिनकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपआयुक्त सचिन पवार, सीताराम बहुरे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, संदीप खोत, पंकज पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सहाय्यक आयुक्त अमित पंडित, तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, अश्विनी गायकवाड, निवेदिता घार्गे, अजिंक्य येळे, पूजा दूधनाळे, परशुराम वाघमोडे, गोरक्षनाथ लिम्हण, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह स्थापत्य, विद्युत, पर्यावरण आदी विभागांचे कार्यकारी अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत दिलेल्या सूचना.

