महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उलगडले विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न; नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद
महसूल मंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्न विचारून मंत्र्यांशी संवाद साधला. एका विद्याथ्याने जन्म दाखला (बर्थ सर्टिफिकेट), रहिवासी दाखला (डोमिसाईल) आणि राष्ट्रीयत्व (नॅशनॅलिटी) प्रमाणपत्रा मिळण्याचा कालावधी कमी करण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच आणखी एका विद्यार्थिनीने, रेशन कार्ड डिजिटल करून मोबाईलवर उपलब्ध करून देण्याची सूचना केली.
महसूल मंत्र्यांकडून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक
विद्यार्थ्यांच्या या अभ्यासपूर्ण आणि प्रगल्भ प्रश्नांना उत्तर देताना महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, 'शासनाच्या आयटी विभागामार्फत डेटा सेंटर आणि डिजिटल प्रणालीचा वापर वाढवण्याचे काम वेगाने सुरू आहे. रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात मोबाईलवर उपलब्ध करून देण्याच्या सूचनेवर शासन आधीच काम करत असून, येत्या काळात ही सुविधा नागरिकांसाठी पूर्णत्वास येईल.' प्रशासकीय कामांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाचे आयोजन नोव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक-अध्यक्ष तथा आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास आमदार विक्रांत पाटील, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, समीर जेऊरकर, डॉ. प्रिया गोरखे यांच्यासह शाळेचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

.jpeg)