प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते अभिवादन...

0 झुंजार झेप न्युज

 प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते अभिवादन...



पिंपरी चिंचवड,दि.17: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत थोर समाजसुधारक, विचारवंत, लेखक आणि पत्रकार केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

     

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शिक्षण समिती सभापती रविना अंघोळकर आणि महिलाबालकल्याण समिती सभापती राणीमाई पठारे,उप आयक्त अण्णा बोदडे,लेखाधिकारी दिपक गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,सामाजिक कार्यकर्ते मधूकर बच्चे यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

    

प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा, जातीय विषमता आणि सामाजिक अन्यायाविरोधात प्रखर भूमिका मांडली. समाजात विवेक, समता, स्वाभिमान आणि परिवर्तनाची जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या निर्भीड विचारांनी आणि परखड लिखाणाने समाजप्रबोधनाला नवी दिशा मिळाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.