हिवरा जाटू येथील पीक परिस्थितीची कृषिमंत्र्यांकडून पाहणी

0 झुंजार झेप न्युज

 हिवरा जाटू येथील पीक परिस्थितीची कृषिमंत्र्यांकडून पाहणी

हिंगोली, दि.20: राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी आज औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू शेतशिवारात सोयाबीन पिकांची पाहणी केली. पाहणीनंतर शेतकरी शंकर दत्तराव कऱ्हाळे यांच्या शेताच्या बांधावर त्यांनी शेतकऱ्यांसोबत बेसन-भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा या साध्या जेवणाचा आस्वाद घेतला.
हिंगोली जिल्ह्यासह औंढा नागनाथ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री भरणे यांनी हिवरा जाटू येथे शेतातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. यावर विविध योजनांच्या माध्यमातून तसेच शासनाकडून लवकरच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री भरणे यांनी दिली.
यावेळी राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी, गटविकास अधिकारी गोपाळ कल्हारे, तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद संघेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.