पिंपरी : रस्त्यावर बंद पडलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून एसटी बसची धडक बसल्याने झालेल्या अपघातात १३ विद्यार्थी आणि ३ शिक्षक जखमी झाले. हा अपघात आज बुधवारी पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर तळेगाव खिंडीत झाला आहे. तर पाच विद्यार्थी आणि एसटी बसचा चालक गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे सर्व विद्यार्थी, शिक्षक संगमनेर तालुक्यातील बी.जे. खताळ विद्यालयातील आहेत.
हे सर्व विद्यार्थी, शिक्षक संगमनेर तालुक्यातील बी.जे. खताळ विद्यालयातील आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालेय सहल अलिबाग या परिसरात गेली होती. आज पहाटेच्या सुमारास एसटी बसने सर्व जण घरी परतत होते. (बुधवार) पहाटेच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव भरधाव वेगात असलेली एसटी रस्त्यात बंद पडलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जाऊन पाठीमागून धडकली.
या अपघातात १३ विद्यार्थी आणि ३ शिक्षक जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये एकूण ४४ विद्यार्थी होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. सर्व विद्यार्थी गाढ झोपेत असताना अचानक अपघात झाला. तपास तळेगाव पोलीस करत आहेत.

