१ जूनपासून 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेचा शुभारंभ !

0 झुंजार झेप न्युज

नवी दिल्ली : एक देश एक रेशन कार्ड योजना 1 जून पासून लागू करण्यात येणार आहे. याविषयीची माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहक एका रेशन कार्डाचा वापर देशभरात कोणत्याही ठिकाणी करू शकणार आहे.
यापूर्वी एक देश एक रेशन कार्ड या योजनेचा पायलट प्रोजेक्‍ट चार राज्यांमध्ये लागू करण्यात आला होता. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गुजरात या राज्यांमध्ये रेशन कार्डाच्या पोर्टेबिलिटीची सुविधा देण्यात आली होती. रामविलास पासवान यांनी या योजनेचे ऑनलाइन उद्घाटनदेखील केले होते. हा पायलट प्रोजेक्‍ट यशस्वी झाल्यास देशभरात ही योजना देशभरात लागू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली होती.
या योजनेमुळे रेशन कार्ड धारक देशभरातील कोणत्याही रेशनच्या दुकानांमधून स्वस्त दरांमध्ये धान्य खरेदी करू शकणार आहे. या योजनेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या कामगारांनाही अनुदानित धान्यापासून वंचित राहावे लागणार नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.