'बँक फोडून टाकेन!' बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांचा छळ, नवनीत राणांना संताप अनावर

0 झुंजार झेप न्युज

अमरावतीच्या नवनीत राणा मेळघाटाच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी असलेल्या चुर्णी गावातील अलाहावाद बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी तेथील आदिवासींना त्रास देत असल्याच्या तक्रारी त्यांच्या कानावर येत होत्या. या तक्रारींची दखल घेत त्या आज गावतील बँकेच्या शाखेत पोहोचल्या.त्यावेळी संतापलेल्या राणा यांनी बँक कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना बँक फोडण्याचा इशारा दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिवासी लोकांना त्रास देतात आणि तासनतास रांगेत उभे ठेवतात, बँकेतून एक हजार रुपये काढायचे असल्यास चार दिवस बँकेच्या चकरा माराव्या लागतात, अशा प्रकारच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून खासदार नवनीत राणा यांच्याकडे येत होत्या.
या तक्रारींबाबत माहिती घेण्यासाठी नवनीत राणा स्वत: मेळघाटमधील चुर्णी गावातील बँकेत पोहचल्या, तेव्हा ग्राहकांनी त्यांना बँकेकडून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. नवनीत राणा यांनी यासंदर्भात बँक कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे नवनीत राणा यांना राग अनावर झाला. 'पाच वाजेपर्यंत मी इथेच थांबते. तोपर्यंत योग्य उत्तर मिळालं नाही, तर बँक फोडून टाकेन, असा दमही त्यांनी दिला. शेवटी पाच वाजता बँकेने लेखी आश्वासन दिल्यानंतर नवनीत राणा तिथून निघाल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.